Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Sunday, 21 April 2013

Widgets

ब्‍लॉग पोस्‍टच्‍या खाली फेसबुक लाईक बटन जोडा (How to add facebook like button under blogpost)

            आज प्रत्‍येकाजवळ एवढे वेळ नाही की, वाचन करावे किंवा एखादे छंद जोपासावे तेंव्‍हा फेसबुकमध्‍ये रोज पोस्‍ट होणारे लेख वाचून त्‍यावर आपले प्रतिक्रीया व्‍यक्‍त करण्‍याइतपत वेळच कोणाजवळ नसते. वेळ असले तरी कोणी प्रतिक्रीया व्‍यक्‍त करण्‍यास आनंदाने तयार होत नाही. त्‍याचे अनेक कारणे आहेत  आपण दिलेल्‍या प्रतिक्रीये बद्दल लेखक आपल्‍यावर नाराज तर होणार नाही ना? तसेच प्रतिक्रीया द्यायचे तर नेमके काय प्रतिक्रीया द्यायचे?  कोणते शब्‍दाचे वापर करावे? असे अनेक प्रश्‍न आपल्‍यासमोर निर्माण होत असतात. माझ्यासमोर तर हेच प्रश्‍न कधी कधी निर्माण होतात.
         फेसबुकवर एखादा लेख जास्‍तच आवडल्‍यास आपण एक गोष्‍ट आवर्जून करतो ते म्‍हणजे फेसबूक लाईक. लाईक बटन क्लिक करुन आपण त्‍यातच आनंद मानतो. अशा अनेक सुविधामूळे आज फेसबुक सर्वसामान्‍य माणसापर्यंत पोहचलेला आहे.

        तर आज आपण आपल्‍या ब्‍लॉगवर सुध्‍दा फेसबुक लाईक बटन कसे तयार करायचे पाहणार आहोत.



१. प्रथम आपल्‍या ब्‍लॉगर अकाऊंट लॉग इन करा. 

जेव्‍हा तुम्‍ही Log in करता तेंव्‍हा तुम्‍ही तुमच्‍या ब्‍लॉगर डॅशबोर्डवर असता... 
मागील लेखमध्‍ये आपण पाहिलेले आहे की Layout वर कसे जायचे तसेच डॅशबोर्डवर आपण लेख तयार करण्‍यासाठी जे बटन क्लिक करतो त्‍याच्‍या उजव्‍या बाजूला लहान एक बटन दिसेल त्‍यावर क्लिक करा.
त्‍यानंतर एक ड्रॉपडाऊन मेनू लिस्‍ट दिसेल त्‍यामधील Template हा पर्याय निवडा.... 

Template विंन्‍डो खालीलप्रमाणे दिसेल....

      वरील Template विंन्‍डोमध्‍ये Live on Blog व Mobile असे दोन पर्याय दिसतील त्‍यामधील Live on Blog च्‍या ठिक खाली दोन पर्याय दिसतील त्‍यातील Edit HTML वर क्लिक करा... पुढील विन्‍डो उघडेल.....
आता तुम्‍ही Template -Edit HTML या पेजवर आहात...........
या पेजवर कोणतेही बदल करताना आपल्‍या Template चा आवश्‍य बॅकअप घ्‍या.....
बॅकअप कसे घ्‍यायचे? 
     वरील Template विंन्‍डोमध्‍ये ठिक उजव्‍या बाजूला Backup/Restore पर्याय दिसेल या व्‍दारे आपण आपल्‍या Template चा बॅकअप घेऊ शकतो.
     वरील Template- Edit HTML या विंन्‍डोवर ठिक वरच्‍या बाजूला Expand Widget Template च्‍या समोरील चेकबॉस्‍कवर चेकमार्क लावा.
कोडचा खूप मोठी यादी आपल्‍यासमोर दिसेल या मध्‍ये फेरफार करताना थोडे जपून करा....
१. या कोडमधून <data:post.body/> हा कोड शोधा..
कोडच्‍या मोठी लिस्‍टमधून वरील कोड शोधणे खूप अवघड काम आहे त्‍यासाठी एक टिप्‍स.. 
कंट्रोल F कॉंबीनेशन बटन क्लिक करा आणि वरील कोड कॉपी करुन पेस्‍ट करा नेस्‍क्‍ट क्लिक करा वरील कोड कोडलिस्‍टमध्‍ये दिसेल... 
२. वरील कोड मिळाल्‍यानंतर त्‍या कोडच्‍या ठिक खाली पूढील कोड पेस्‍ट करा.  


<b:if cond='data:blog.pageType != &quot;static_page&quot;'> <iframe allowTransparency='true' expr:src='&quot;http://www.facebook.com/plugins/like.php?href=&quot; + data:post.canonicalUrl + &quot;&amp;send=false&amp;layout=box_count&amp;show_faces=false&amp;width=55&amp;action=like&amp;font=arial&amp;colorscheme=light&amp;height=62&quot;' frameborder='0' scrolling='no' style='border:none; overflow:hidden; width:55px; height:62px;'/> </b:if>   

वरील कोड पेस्‍ट केल्‍यानंतर Preview पहा..   सेव्‍ह करण्‍याचा घाई करु नका तुमच्‍या ब्‍लॉगपोस्‍टखाली व्‍यवस्थित फेसबुक लाईक बटन आला असेल त्‍याशिवाय वेगळी कोणतीही बदल झालेला नसेल तर मग तुमचा Template Save करायला काही हरकत नाही.
 तुमचा फेसबुक लाईक बटन पुढील प्रमाणे दिसेल...
 
तुमचा फेसबुक लाईक बटन पुढील प्रमाणे दिसेल...
वरील लेख आवडल्‍यास पोस्‍टखाली दिसणा-या फेसबुक लाईक बटनवर क्लिक करायला विसरु नका.... 
आपल्‍या ब्‍लॉगवर फेसबूक लाईक बटन तयार करा व त्‍याबद्दल प्रतिक्रीया आवश्‍य लिहा....





SHARE THIS POST   

  • Facebook
  • Twitter
  • Myspace
  • Google Buzz
  • Reddit
  • Stumnleupon
  • Delicious
  • Digg
  • Technorati
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्‍हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्‍यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्‍या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्‍हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्‍या माध्‍यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्‍ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →

0 comments: