Sunday, 24 March 2019
हजारो कर्मचा-यांची ७ वा वेतन निश्चिती केवळ ५ मिनीटात करा.
हजारो कर्मचा-यांची ७ वा वेतन निश्चिती केवळ ५ मिनीटात शक्य...... ?
महाराष्ट्रातील शासकीय कर्मचा-याना ७वा वेतन आयोग लागु झालेला आहे. तसेच माहे मार्च वेतन ७वा वेतन आयोगानुसार काढण्यासाठी प्रत्येक कार्यालयात तयारी चालु आहे. वेतन नेमका किती वाढला याची उत्सुकता देखील प्रत्येक कर्मचा-याला आहे. अशात रोज Whats app वर ७ वा वेतन निश्चिती संदर्भात अनेक मेसेज फिरत आहेत वेगवेगळ्या प्रकारे calculations केला जात आहे. कोणता विकल्प भरावा ? कोणता विकल्प भरल्यास किती फायदा होणार आहे. अशाप्रकारे असंख्य प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे.
या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मी Excel मध्ये एक File तयार केलेला आहे. या file च्या सहाय्याने केवळ पाचच मिनीटात हजारो कर्मचा-यांची ७ वेतन आयोेेगाप्रमाणे वेतन निश्चिती करता येते. समजा एका तालुक्यात १२०० शिक्षक आहेत असे समजू.... १२०० शिक्षकांची वेतन निश्चिती केवळ ५ मिनीटात होईल. यासाठी आपल्याजवळ सर्व शिक्षकांची प्राथमिक माहीती असणे आवश्यक आहे. उदा. शिक्षकाचे पूर्ण नाव, पद, शाळा, दिनांक १/१/२०१६ ची बेसिक, ग्रेड पे बस्स एवढा माहीती Excel Sheet मध्यो उपलब्ध असेल तर ५ मिनीट देखील वेळ लागणार नाही.
सदर Excel File मध्ये नेमका काय तयार होईल व कसे काम करेल ?
या फाईलमध्ये कांही प्राथमिक माहीती भरल्यानंतर Bulk व्दारे हजारो कर्मचा-यांची वेतन निश्चिती तयार होते.
यामध्ये प्रामुख्याने.....
१. प्रत्येकाचे विकल्प
२. प्रत्येकाचे वचन पत्र
३. १/२/३/४ महिन्याचे वेतन फरक तक्ता
४. दिनांक ०१/०१/२०१६ ते दि.३१/१२/२०१८ पर्यंत फरक तक्ता (प्रत्येकी )
५. वेतन वाढ तक्ता
६. माहे जानेवारी / फेब्रुवारी / मार्च महीन्याचा पे बील (2/3 फरकासह)
७. एकाच क्लिकमध्ये जेवढे कर्मचारी तेवढे सर्व तक्ते PDF मध्ये तयार होतील.
File वापरताना कोणती काळजी घ्यावी ?
१. सदर फाईलमध्ये VBA/ Macro चा वापर केल्यामूळे सदर फाईल फक्त संगणकावरच (only PC) चालेल.
मोबाईलवर फाईल open होणार नाही.
२. शक्यतो सदर फाईल Office 2007 च्या पुढील व्हर्जनवर वापरावेत म्हणजे कोणतेही अडचण येणार नाही.
३. प्रथम आपल्या PC वर फाईल रन/Open करताना वरच्या बाजूस एक मेसेज येईल त्यातील Enable content वर क्लिक करावे. सदर मेसेज फक्त पहिल्या वेळीच येईल.
४. तारीख योग्य प्रकारे काम करण्यासाठी आपल्या PC चा date format बदलून घ्यावा. बदल कसं करायचं या बाबत फाईलमधील Help वर क्लिक करुन वाचावे.
५. PDF तयार करताना कर्मचारी संख्यानुसार कमी अधिक वेळ लागु शकेल.
६. Create PDF वर क्लिक करण्यापूर्वी एकदा Print preview आवश्य पहावा.
७. सर्व पेज A4 वर सेट केलेला आहे. तरी देखील कमी जास्त होत असेल तर print set up वरील टक्केवारी कमी अधिक करुन पहा.
File कोणासाठी उपयुक्त ठरेल? कोठे वापर करता येईल ?
1. केंद्र स्तरावर काम करत असताना
2. तालुका स्तरावर
3.जिल्हा स्तरावर
4.एका शाळेसाठी / कार्यालयासाठी
५. एका व्यक्तीसाठी
File Download Link
File Format : Excel
File Size : 4.5 Mb
File upload : 31/03/2019 6.00 PM
"सदर फाईल गरजुवंताना मदत व्हावी म्हणून तयार केलेला आहे. यातुन कोणतेही आर्थिक फायदा अथवा श्रेय मिळविण्यासाठी तयार केलेला नाही. ज्यांना पाहीजे ते कोणीही फाईल वापरु शकतील. कृपया सदर फाईलचा वापर आर्थिक लाभासाठी अथवा राजकीय श्रेयवादासाठी करु नये ही विनंती."
या फाईल संदर्भात कांही सुचना / दुरुस्ती /बदल / असतील तर आवश्य कळवावे.
या फाईलमध्ये तयार होणा-या फॉर्मस् , तक्ते आपण स्वता तपासून पहावे.
*या फाईलमध्ये चुका असु शकतात. या फाईलमध्ये तयार होणरा माहीती बरोबर असेलच असे नाही.
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
Very nice somnath sirji
ReplyDeleteYou are great person in technology without any cost and small function, all technically objects teach a simple language .
Thanks
Sirji
खूप चांगली आणि उपयुक्त फाईल
DeleteThanks sirji...!
ReplyDeleteसोमनाथ सर, आपले काम ना फायद्यासाठी, ना नावासाठी. फक्त आणि फक्त गुरूजनांच्या सेवेसाठी. .... शतशः धन्यवाद सर
ReplyDeleteYou are always make things easier.
ReplyDeleteU r Simply Great 👌👌👍👍👍
ReplyDeleteBest work sir
ReplyDelete** आपण करीत असलेल्या कार्याला शुभेच्छा !
ReplyDeleteGreat Work *
निस्वार्थ सेवा
ReplyDelete