Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Friday, 17 May 2013

Widgets

सर्च इंजिन आणि आपण.....





        तुम्‍हांला एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर तुम्‍ही काय करता ? असे जर प्रश्‍न विचारले तर तुमच्‍याकडून तात्‍काळ उत्‍तर येते - गुगलवर सर्च करतो... १९९८ साली विद्यापीठात शिकणा-या दोन विद्यार्थ्‍यानी स्‍थापन केलेल्‍या या सर्च इंजिनने इतर सर्वांना मागे टाकले आहे. याचे कारण  गुगलच्‍या अनेक सर्व्‍हर्समध्‍ये आठ अब्‍जांपेक्षा जास्‍त संकेतस्‍थळे संग्रहित केलेली आहेत. त्‍यातुन तुम्‍हाला हवी असलेली माहिती क्षणार्धात तुमच्‍यासमोर ठेवून गुगल तुमची इच्‍छा पुरविते. गुगल सर्च इंजिन इतक्‍या जलद गतीने संकेतस्‍थळे कसे शोधून काढते याबद्दल आश्‍चर्य वाटल्‍याशिवाय राहत नाही.
       
        गुगलने आपली कार्यक्षमता इतकी विस्‍तृत केली की, जीवनाच्‍या सर्व क्षेत्रांतील माहितीसाठी त्‍याने आपली दारे उघडी केली आहेत. 'अल्‍लाउद्दीन आणि जादूचा दिवा' या गोष्‍टीतील राक्षस ज्‍याप्रमाणे पाहिजे ती गोष्‍ट सादर करते तसेच गुगल सर्च इंजिन तुम्‍हांला जी हवी ती माहिती तात्‍काळ हजर करते. 

       गुगल व इतर सर्च इंजिनवर आपला वेब व ब्‍लॉग दिसण्‍यासाठी सर्च इंजिनवर म्‍हणजे वेबमास्‍टर टूलवर नोंदणी करावे लागेल ? त्‍यासाठी काय काय करायचे याविषयी जाणून घेऊया....



        गुगलप्रमाणे अनेक सर्च इंजिन नेटवर उपब्‍ध आहेत पण गुगल सर्च इंजिन सगळ्यात प्रशिध्‍द आहे कारण गुगलने अनेक सेवा उपध्‍द करुन दिलेला आहे तेही अगदी मोफत.

ग्रंथालय-
             आजपर्यंत जगात जी जी पुस्‍तके प्रकाशित झाली व ज्‍यांचा 'कॉपी राईट' ची मुदत संपलेली आहे असे सर्व ग्रंथ स्‍कॅन करुन books.google.com या आपल्‍या संकेतस्‍थावर गुगलने सर्वांसाठी उपलध्‍द करुन दिलेला आहे.

पत्रव्‍यवहार-
             इ-मेलच्‍याच धर्तीवर १ एप्रिल २००४ रोजी गुगलने जी मेल चा प्रारंभ केला. तुम्‍ही जी- मेलचे सभासद झालात तर तुमच्‍यासाठी २ जीबीचा मेमरी राखून ठेवते.

ब्‍लॉग -
       सामान्‍य व्‍यक्तिच्‍या हातातील एक जबरदस्‍त आणि अभिनव प्रसारमाध्‍यम असे ब्‍लॉग या संकेतस्‍थळाचे वर्णन करता येईल. गुगल ही सेवा अगदी मुक्‍तमध्‍ये पुरविते. www.blogger.com

नकाशे, पृथ्‍वीदर्शन, छायाचित्रे, व्हिडीओ क्लिप्‍स, यलो पेजेस, बातम्‍या ...... असे अनेक सेवा गुगल पुरविते.

       गुगल व इतर सर्च इंजिनवर प्रथम रजिस्‍ट्रेशन करावे लागते त्‍यानंतर आपले वेब किंवा ब्‍लॉग नोंदणी केली जाईल तेही अगदी मोफत. एकदा नोंदणी केली की मग वेबच्‍या नावाने सर्च केली की तात्‍काळ वेब किंवा ब्‍लॉगविषयी माहिती दर्शविली जाते.

      खाली दिलेल्‍या फ्रीवेब सबमिशनव्‍दारेही २० पेक्षा अधिक सर्च इंजिनवर नोंदणी करु शकता अगदी मोफत..



      वर दिसणा-या फ्रीवेब सबमिशन टुलमध्‍ये तमच्‍या वेबचा पत्‍ता अचूक लिहा त्‍यानंर तुमचा नाव व इमेल अड्रेस लिहून Submit your site वर क्लिक करा. अशाप्रकारे खाली दिसणा-या सर्च इंजिनवर तुमचा वेब नोंदविला जाईल.




SHARE THIS POST   

  • Facebook
  • Twitter
  • Myspace
  • Google Buzz
  • Reddit
  • Stumnleupon
  • Delicious
  • Digg
  • Technorati
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्‍हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्‍यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्‍या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्‍हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्‍या माध्‍यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्‍ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →

0 comments: