Sunday, 3 March 2013
नेटवर आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाचे काळजी
1.नेटवर आर्थिक व्यवहार उदा.Net Banking इत्यादी वर व्यवहार करताना नेहमी दक्ष रहायला पाहिजे. आपले Username व Password कोणासमोर प्रकट करु नये.
2.Password तयार करत असताना फक्त अक्षर किंवा फक्त अंकाचा वापर करणे कटाक्षाने टाळावेत. Password तयार करत असताना अक्षर, अंक आणि विशेष चिंन्हांचा वापर करावे उदा. Rntog368back?/rd अशा स्वरुपाचे सशक्त पासवर्ड देणे कधिही चांगले.
3.नेटवर Password टाईप करताना किबोर्डचा वापर शक्यतो टाळावेत बाजूला असलेले Virtual Keyboard चा वापर करावे. कारण कीबोर्डवरील प्रत्येक कीला एक विशिष्ट कोड असतो त्यामूळे तुम्ही कीबोर्डवरुन दिलेला Password हॅकर सहज ओळखू शकतो.
4.काही काळानंतर Password सतत बदलत राहणे कधिही उत्तम. एकच Password वर्षानुवर्षे वापरणे टाळा.
5.सहजासहजी हॅक होणा-या Browser वापरु नका. उदा. Internet Explorer इतर अनेक Browser नेट वर मुक्तपणे मिळतात त्याचा वापर करा.
6.Gmail Account नेट कॅपेवर व इतर अन्य ठिकाणी Log in करताना Log in च्या शेजारी असलेल्या Stay Singed in च्या समोरील रखान्यात चेक मार्क असेल तर काढूनच Log in करा.
नेटवर व Email , SMS, किंवा अन्य माध्यमाद्वारे Username व Password विचारले गेल्यास ते कोणत्याही परस्थितीत देवू नका अगर सांगू नका.
7.बक्षिसाचे आमिष दाखवून किंवा अन्य मार्गाने Username व Password मिळविण्यासाठी हॅकर प्रयत्नशिल असतात तर कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
8.
ATM अगर DEBIT CARD चा नंबर व Pin code कोठेही लिहून ठेऊ नका किंवा कोणाला सांगु नका.
वरील काळजी घेतल्यास आपली कधीच फसवणूक होणार नाही.

लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
नेट कट्टा
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments: