Tuesday, 26 February 2013
शिक्षकांसाठी उपयुक्त वेबसाईट्स
http://www.education-world.com
वर्गात शिकवित असताना अनंत अडचणी सतत येत असतात. एखादा घटक कसा शिकवावा म्हणजे विद्यार्थ्याना लवकर समजेल? कोणते शैक्षणिक साहित्य वापरावे म्हणजे अध्यापन प्रभावीपणे होईल? असे अनेक प्रश्न कृतिशिल शिक्ष्ाकाना सतत भेडसावत असतात. अशावेळी जर आपण Education world या सारख्या वेबसाईटचा उपयोग करुन घेतला तर अध्यापन करताना खूपच मदत होणार आहे.
ही साईट शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त असे साईट आहे. यावर पाठनियोजन, अभ्यासक्रम, अध्यापनाचे विविध तंत्रज्ञान उत्कृष्टपणे मांडलेले आहे. असे हे बहुपयोगी वेबसाईटला एखदा आवश्य भेट द्याच.
http://www.teacherfreebies.com/
Teacherfreebies या नावाप्रमाणाचे हे वेबसाईट शिक्षक मित्रांसाठी १०० हून अधिक साहित्य उपलब्ध करुन देते तेही अगदी मोफत. या वेबसाईटचे आणखिन एक वैशिट्य म्हणजे पुस्तकापासून ते थेट कॅटलॉग पर्यंतचे सर्व साहित्य चक्क मोफत मिळते. शिक्षणाविषयी नवनविन बातम्या, शोध, अध्यापन तंत्रे, विद्यार्थ्याना आकर्षित करुन घेण्यासाठी वापरावयाचे विविध साहित्य,साधने अतिशय सुटसुटीत मांडणी या साईटमध्ये आढळते. मला आवडलेल्या साईटमधून हे एक साईट आहे. या साईटमध्ये शिक्षकांसाठी असलेले विविध साईटचे खुप मोठी लिस्ट या मध्ये दिलेली आहे.
http://discoveryschools.com/
हा साईट खास करुन विद्यार्थी, शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी डिझाईन केलेला आहे. जरी सर्वांसाठी सेवा उपलब्द करुन देत असला तरी शिक्षकांसाठी अनेक उपयुक्त सदर या वेबसाईटमध्ये अनेक ठिकाणी आढळून येतात. लेसन प्लॅनपासून ते अध्यापन साहित्यापर्यंत अनेक गोष्टी आढळून येतात. तसेच अनेक वेबसाईटचे लिंकही सुंदरप्रकारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक शैक्षणिक गेम्स, पझल्स, मेज अशाप्रकारे बुध्दीला खुराक देणारे विविध साधनेही हा वेबसाईट पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून येते.
http://www.teachervision.fen.com/
शिक्षकांना जे शिकवावे लागते ते सर्व बाबी या वेबसाईटमधून मिळते. हे वेबसाईटचे वर्णन Learning Network करते. या वेबमध्ये नवनविन पध्दती, विद्यार्थ्याना आकर्षित करतील असे माहिती, कोडी, विविध विषय सोपे करुन कसे सांगावे याचे टिप्स असे वैविध्दपूर्ण मांडणी या साईटचे वैशिट्य म्हणावे लागेल.
आणखिन काही वेबसाईट्स
www.teacherpathfinder.org
www.connectingstudents.com
www.padhaee.com
www.teachnet.com
माझ्या अल्पबुध्दीप्रमाणे मी काही वेबसाईट्चे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजुन भरपुर उपयुक्त वेबस आहेत परंतु वेळेअभावी सर्व वेबची माहिती मी देऊ शकलो नाही असो.... हे माझे प्रयत्न म्हणजे सुर्याचे काजव्याने केलेली प्रशंसा होईल. मी अजून नेट शिकणारा विद्यार्थी आहे काही चुकल्यास माफ करा. आपले काही सुचना, मार्गदर्शन, किंवा पोस्टबाबत माहिती असेल तर जरुर माझ्या email वर जरुर कळवा आपल्या सुचनांचा स्वागतच होईल.
email - somnathgaikwad7@gmail.com

लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
वेबसाईट्स
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments: