Saturday, 20 July 2013
How to create new blog step by step guide
ब्लॉग हे वेबलॉग या शब्दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्थळाचाच म्हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्लॉग हे एक व्यक्ती किंवा व्यक्तिंचा समूह ब्लॉग निर्माण करतो. ब्लॉगमध्ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्स (सांधे) दिलेले असतात. नविन मजकूर ब्लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्लॉगिंग' असे म्हणतात. ब्लॉगवरील लेखांना 'ब्लॉगपोस्ट' 'एन्ट्रिज' म्हणतात. ब्लॉग लिहीणा-या लेखकांना ब्लॉगर म्हणून संबोधले जाते. आज ब्लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्लॉग तयार करुया.....
१. स्वत: चा Gmail ID
2. नेट कनेक्शन
वरील दोन्ही गोष्टी उपलब्ध असतील तर ब्लॉग तयार करण्यासाठी काही अडचण येणार नाही फक्त ५ मिनीटात तुमचा ब्लॉग तयार होईल.
सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्या gmail Id व्दारे Log in करा.
Log in केल्यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...
blogger dashboard वर New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल जसे.....
वरील विंडोजमध्ये तुम्हाला ब्लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा. Netkari (नेटकरी) , मृगजळ...एक नसलेल अस्तित्व
Address मध्ये तुमच्या ब्लॉगला तुम्ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्या नावाने अड्रेस तयार करता येईल. उदा.somnath-gaikwad.blogspot.com किंवा netkari.blogspot.in
blog address टाईप केल्यानंतर उपलब्ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्ध नसेल तर sorry this blog address is not available म्हणून त्याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्न करा उपलब्ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल तर सर्वात खाली दिसणा-या Create blog वर क्लिक करा तुमचा ब्लॉग तयार होईल. जसे....
तुम्ही तयार केलेला ब्लॉग डॅशबोर्डवर दिसू लागेल. त्याच्या खाली एक मेसेज दिसेल Start posting वर क्लिक करा किंवा पेन्सिलचा चित्र दिसत आहे त्यावर क्लिक करा ब्लॉग पोस्टींगचा विंडो उघडेल जसे....
वरील ब्लॉग पोस्टच्या विंडोमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी महत्त्वाचे आहेत Post समोरील चौकोनात ब्लॉगचा Title लिहा खाली मोठा स्पेस दिसेल त्यामध्ये तुमचा विचार , मुद्दे , चित्रे आणि लिंक्स तयार करु शकता लेख पूर्ण झाल्यानंतर उजव्या बाजूला दिसणा-या Publish वर क्लिक करा तुमचा लेख ब्लॉगवर प्रकाशित होईल तेही कोणत्याही प्रकाशकाशिवाय.
ब्लॉग विषयी अधिक जाणून घेण्यासाठी पूढील लिंकवर क्लिक करा Blog tips and tricks

लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
ब्लॉग टिप्स
Subscribe to:
Post Comments (Atom)
ideal work
ReplyDeleteideal work
ReplyDeleteVery Nice Work Sir...................... Plz. give me tricks about creat new blog. I read it your information but i have no understand it. So plz. .............
ReplyDeletemy e- mail Id ......... dattamane74@gmail.com
mob. no. 9975685930
Sirji Namskar,
ReplyDeleteI inspire from your blog. Please guide me about sub menu.
very good information u give for all teachers i love it thanks
ReplyDeleteआपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteआपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteI liked. This is so good.
ReplyDeletesirji excellent work
ReplyDelete