Thursday, 31 December 2015
How to create menu in blogspot (blog वर मेनू कसे add करावे?)
ब्लॉग मेनू
ब्लॉग उघडल्यावर वर कांही tabs दिसतात त्यांना सर्वसामान्यपणे मेनू असे संबोधले जाते.
मेनू कशासाठी ?
ठराविक लिंक अथवा पेज एका क्लीकवर मिळावे या हेतुने ब्लॉग अथवा वेबसाइटवर मेनू तयार केला जातो म्हणजे navigation सहज व सुलभ होण्याच्या दृष्टीने मेनू आवश्यक आहे.
मेनुची नावे
प्रत्येक मेनूला विशिष्ट नाव दिले जाते जसे की Home, contact, Download, Books, GR, संपर्क साधा, शालेय रेकॉर्ड, किंवा अन्य आपल्या आवडीनुसार आपण मेनुला नावे देवू शकतो. की जेणे करून वाचकाला विशिष्ट पेज अथवा लिंक शोधणे सोपे जावे या मागचा हेतु असतो.
मेनू कसे तयार करायचे ?
मेनू दोन प्रकारचे असतात एक वेब लिंक दुसरा कंटेंट म्हणजेच लिखित साहित्य...
1.सर्व प्रथम blogger वर log in करा.
2.log in केल्यावर blogger Dashboard दिसेल.
3.blogger dashboard वरील pages वर क्लिक करा.
4.त्यानंतर एक विंडो उघडेल वरच्या बाजुला new page दिसेल त्यावर क्लिक करा.
5.new page वर क्लिक केल्यावर दोन पर्याय दिसतील 1.Blank page 2.Web address
आता तुम्हाला ठरवावे लागेल की आपल्याला नेमके कोणत्या स्वरूपाचे मेनू तयार करावयाचे आहे उदा. मला महाराष्ट्राचा GR चा अथवा माझ्या आवडीचा वेबचा एक मेनू तयार करावयाचा आहे. यासाठी मला web address या आप्शनची निवड करावी लागेल.
या मध्ये आणखी एक करता येईल आपल्या एखाद्या पोस्टची लिंकही देता येईल जसे की - ईमेल ट्रिक्स या नावानी मला एक मेनू तयार करावयाचे आहे तर या ठिकाणी मी माझ्या ब्लॉगवरील आपल्या ईमेल वरुन आपली ख़ास ओळख बनवा या पोस्टचा लिंक या ठिकाणी देवू शकतो.
www.netkari.blogspot.in/2015/12/email-account.html?m=1
पोस्टचा लिंक कसे तयार करावे ?
एखादा पोस्ट तुम्ही तयार केलेला अथवा तुम्हाला आवश्यक असलेला ओपन करा.
आता browser वरील एड्रेस बारवरील संपुर्ण लिंक कॉपी करा आणि एड्रेस लिंकमध्ये पेस्ट करा..
आता माझ्या विषयी (about me )मेनू तयार करावयाचा आहे ....
यासाठी मला blank page घ्यावे लागेल.
blank page वर मेनू टाइटल देवून खाली तुमच्या विषयी माहिती टाइप करु शकता.
शेवटी ....
आता शेवटी पेज publish करण्यापूर्वी तुम्ही तयार केलेला पेज कसं दिसतं preview करून पहा. योग्य वाटत असेल तर publish करा.
पेज publish केल्यानंतर जेंव्हा आपण पेज निवडलो त्या ठिकाणी तुम्ही तयार केलेला पेज दिसेल त्यावर तिन पर्याय दिसतील.... page arrangement
1.Top tabs
2.Slide links
3.Don't show
वरील पैकी top tabs निवडून save arrangement क्लिक करा.
आता तुमच्या ब्लॉगवर मेनू दिसू लागेल ..
Nice Blog sirji
ReplyDeleteछान माहिती सर
ReplyDeletesubmenu बद्दल माहिती पोस्ट करा सर
ReplyDeleteVery Usefull and Nice Blog
ReplyDeleteVery Usefull and Nice Blog
ReplyDeletevery very best blog sir....very useful.
ReplyDeleteVery Usefull and Nice Blog
ReplyDelete