Thursday, 25 February 2016
Microsoft office च्या excel मध्ये अंकाचे रूपांतर अक्षरात कसं करायचं ?
Microsoft office सॉफ्टवेयर ऑफिसच्या कामासाठी तसेच फक्त कागदी कामकाज करण्यासाठी वापरला जातो हा समज आता मागे पडला आहे. या सॉफ्टवेयरचा वापर दिवसेंदिवस इतर अन्य क्षेत्रातही वाढत आहे. यामध्ये लेटर, नोट्स, टॅक्स, सेमीनार, व्यावसायिक प्रेजेन्टेशन पासून ते थेट विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी प्रभाविपणे वापर केला जात आहे. यामध्ये Excel हा अनेक आकडेमोड अथवा टेबल स्वरूपाचे फॉर्मेट्स तयार करण्यासाठी वापरला जातो यामध्ये अनेक functions आहेत त्याद्वारे अनेक गणिती क्रिया, गुंतागुंतीची आकडेमोड करणे सहज शक्य होते. उदा. If, Sum, countif, vlookup, max, min, index, date, day ..... असे अनेक functions आहेत function चा यादी केल्यास संपुर्ण पेज भरून जाईल. यामध्ये कांही function रोजच वापरावे लागतात तर कांही कधीतरी उपयोगी पडतात. एकूणच excel मधील function मुळे अवघड वाटणारे आकडेमोडही चुटकी सरशी पूर्ण करता येते.
Excel मध्ये सर्व कांही अनेक फंक्शनच्या सहाय्याने करता येते मात्र अंक अक्षरात रूपांतर करण्यासाठी मात्र तारेवरची कसरत करावी लागते. म्हणजे function वापरून सहजा सहजी शक्य होत नाही. मग कसं करायच ?? असा प्रश्न तुम्हाला कधाचित पडला असेल नाही का ...
यासाठीच हा लेखन प्रपंच...
अगदी सोपं काम करायच आहे मित्रानो, मी खाली एक VBA कोड देणार आहे ते फक्त कॉपी करायचं आणि मी सांगतो त्या ठिकाणी पेस्ट करायचं झालं... नवीन function तयार... आहे की नाही अगदी सोपं काम.
संपुर्ण पोस्ट वाचण्यासाठी read more वर क्लीक करा ....
संपुर्ण पोस्ट वाचण्यासाठी read more वर क्लीक करा ....
1. Microsoft office चा excel ओपन करा किंवा ज्या sheet मध्ये अंकाचे रूपांतर अक्षरात करायचं आहे ते शीट ओपन करा.
2. की बोर्डवरील ऑल्ट आणि F11 function key प्रेस करा. VBA एडिटर ओपन होईल. (Alt +F11)
3. insert वर क्लीक करा आणि त्यामध्ये module निवडा.
4. एक blank page ओपन होईल. आता या पेजवर खालील vba कोड कॉपी करून पेस्ट करा झालं.
5.VBA एडिटर close करा. तुम्ही सुरवातीला उघडलेला एक्सेल शीट दिसेल आता यामध्ये =spellnumber() टाइप करा. आणि कोणत्याही अंकाचे रूपांतर अक्षरात करा.
6.अत्यंत महत्त्वाचे :- हा function फक्त या file मध्येच वापरता येईल. दुसऱ्या file साठी वापरताना परत त्याच्या vba एडिटर मध्ये कोड पेस्ट करावे लागेल. सदर file save करताना मात्र file type नेहमी excel workbook म्हणून असते ते बदलून excel micro enabled workbook म्हणून save करावे लागेल.
VBA Code
VBA Code
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
Very nice sir
ReplyDeleteThanks sir!
DeleteVery nice sir
ReplyDeleteVery Nice sir,
ReplyDeleteSuperb information to us.
Thanks
छान सर
ReplyDeletesir
ReplyDeleteerror is
सोमनाथ सर तुमचे करी महान आहे .तुमंच्यामुळे आम्हाला नवीन तंत्रज्ञान शिकाकायला मिळते.
ReplyDeleteतुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
आपला तंत्रस्नेही मित्र
सुदाम साळुंके जुन्नर पुणे
7588094067
सोमनाथ सर तुमचे कार्य महान आहे .तुमंच्यामुळे आम्हाला नवीन तंत्रज्ञान शिकाकायला मिळते.
ReplyDeleteतुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
आपला तंत्रस्नेही मित्र
सुदाम साळुंके जुन्नर पुणे
7588094067
Very good
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteसर आपल्या ब्लॉग पासून नविन तंत्राज्ञान भरपुर शिकायला मिळत आहे.त्याबदल मी आपले आभार मानतो.
ReplyDeleteतसेच PC फॉरमॅटींग बाबत पण मााहीती मिळाली तर चांगले
बुटेबल पेनडाईव्ह कसा तयार करतात
ऑफीस 2010 व 2013 हे तसेच OS पण डाऊनलोड होत नाहि आहे सर
याविषयी मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती
Nice sir
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली ..... computer चा वापर सोपा वाटला thanks
ReplyDelete