Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Saturday 27 February 2016

Widgets

How to Install Window 7 Or format PC (संगणक फॉर्मेट अथवा इनस्टॉल कसे करावे ?)

    संगणक फॉर्मेट करणे अथवा नवीन window इनस्टॉल कसे करावे ? यासाठी संपुर्ण मार्गदर्शन या पोस्टद्वारे करण्याचा एक प्रयत्न...

      संगणकाचा वापर आज प्रत्येक क्षेत्रात होत आहे. आज भारत डिजिटल होण्यासाठी सर्वच क्षेत्रात संगणक आणि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. असे असताना शिक्षण क्षेत्र मागे असून कसे चालेल... खाजगी शाळा, व्यावसाईक शिक्षण देणारे तंत्रनिकेतन शाळा ते सरकारी समजले जाणारे जिल्हा परिषद शाळेत आज ई - लर्निंग सारखे संगणक शिक्षण प्रत्येक खेड्यापाड्यात रुजत असल्याचे चित्र दिसत आहे. हायस्कूल सर पासून ते प्राथमिक गुरूजीही आज स्मार्ट झाले आहेत. संगक खराब अथवा बंध पडल्यास मात्र खुप धावपळ होते. जे कोणी तंत्रज्ञ असतील त्याना ते सांगतील तेवढे पैसे देवून सलाम मरावे लागते. यासाठीच संगणक खराब होऊ नये म्हणून आमचे कांही मुख्याध्यापक संगणकाला कोणाला हात लावू देत नाहीत. आता असे करण्याचे काहीच कारण नाही कारण मी तुम्हाला संपुर्ण संगणक कसं दुरुस्त करायचं या बाबत कानमंत्र देणार आहे. प्रत्येक स्टेप समजावून सांगणार आहे आणि अगदी चित्रासह...

Windows 7 कसं इंस्टॉल करायचं या बाबत पाहू या

**संगणक फॉर्मेट करण्यासाठी लागणारे साहित्य..
1.कोणतेही एक विंडोज CD अथवा DVD.
2. Windows CD उपलब्ध नसेल तर बूटेबल पेनड्राइव.
3.आवश्यक असेल तर इतर सॉफ्टवेयर CD.

** Windows 7 Minimum PC requirement 

1. 1 gigahertz (GHz) processor.
2. 1 Gigabyte (GB) RAM
3. 16 to 20 GB Hard disk space.

             ** boot drive set करणे **
सर्वात प्रथम बूटेबल ड्राइव कोणते सेव आहे पाहुन आवश्यक असेल तर बदल करावे लागते. CD Rom select करावे लागते बूटेबल pen drive वरुन इनस्टॉल करायचे झाल्यास बूटेबल ड्राइव रिमूवेबल डिस्क सेलेक्ट करावे लागेल.
     
           बूटेबल ड्राइव सेट करण्यासाठी CD drive मध्ये बूटेबल CD/DVD टाकून संगणक रीस्टार्ट करा आणि संगणक चालू होत असताना key बोर्ड वरील या पैकी लागू होणारे की प्रेस करा Del, / F2, /ESC, / F18, /F9  प्रत्येक motherboard नुसार की बदलू शकते. शक्यतो डेस्कटॉप संगणकासाठी Del बटन तर लैपटॉपसाठी सर्वसामान्यपणे F2 प्रेस करावे.
आता आपण BIOS सेटिंग मध्ये प्रवेश करतो.
अत्यंत महत्त्वाचे:- BIOS सेटिंग मध्ये माहिती असल्याशिवाय कोठेही काही बदल करायला जाऊ नका. फक्त boot या tab वर क्लीक करा.


सदर BIOS विंडो या प्रमाणे दिसेल... यातील boot tab निवडा. जसे ......

boot disk प्रॉपर्टी वर क्लीक करा
यातील 1 st boot device वर क्लीक करा.
एक यादी दिसेल या मध्ये
1. hard disk
2.CD/DVD Rom
3.Removable Disk
यातील CD/DVD rom निवडा आणि F10 प्रेस करा सेव करु का म्हणून मेसेज येईल Yes करा.
आता संगणक restart होईल. संगणक restart झाल्यावर खालील विंडो ओपन होईल.
जेंव्हा
Press any key to boot from CD/DVD ..
असा मेसज दिसेल तेंव्हा लगेच कोणतेही एक की प्रेस करा प्रेस केल्यावर DVD अथवा CD वरुन boot होउन पुढील विंडो ओपन होईल.
जसे...

सर्व files load होण्यासाठी थोडासा वेळ लागेल त्यासाठी wait करा. काही वेळानंतर language व इतर माहितीचा खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.
यामध्ये शक्यतो काहीही बदल न करता Next वर क्लिक करून पुढे चला.. आणि पुढील विंडो open होईल. जसे....
वरील विंडोमध्ये दिसणारा Install Now वर क्लीक करून Next वर क्लीक करा..यानंतर Terms and condition
चा विंडो ओपन होईल. जसे..
वरील विंडोमध्ये [] I Accept the License terms समोर असणाऱ्या चेक बॉक्सवर क्लीक करून Next करा. पुढील विंडो उघडेल जसे..
या विंडोमध्ये which window do you want to install
या मध्ये दोन पर्याय दिसतील
1.Upgrade windows
2.Custom Install
तुमच्या गरजे प्रमाणे सेट करता येईल. उदा. समजा माझ्या pc वर windows xp इंस्टॉल आहे तर बदलून windows 7 इंस्टॉल करायच आहे अशा वेळी मी Upgrade Windows हा पर्याय निवडेन. संपुर्ण pc partition सह नव्याने पार्टीशन करायचे असेल तर मात्र नव्याने विंडोज इनस्टॉल करावे लागेल म्हणून दुसरा पर्याय निवडावे लागेल. Custom पर्याय निवडल्यास कांही वेळानंतर पुढील विंडो ओपन होईल.          जसे...
          
या विंडोमध्ये तुमच्या pc मध्ये पूर्वी उपलब्ध असलेले ड्राइव दिसतील यातील ज्या ड्राइववर विंडोज इनस्टॉल करणार आहे ते ड्राइव निवडून next वर लिक करा. संपुर्ण pc फॉर्मेट करण्यासाठी पुढील प्रमाणे विंडो असेल. 
जसे...

संपुर्ण pc फॉर्मेट करावयाचे असल्यास Drive option (Advanced) वर क्लीक करा. आता अनेक ऑप्शन दिसतील त्यामधील डिलीट /फॉर्मेट निवडा आणि नव्याने पार्टीशन करण्यासाठी new वर लिक करून पाहिजे तेवढे पार्टीशन करा. आणि ड्राइव निवडून next करा आणि पुढील विंडो उघडेल...
जसे...
या विंडोमध्ये आपल्याला काही करावे लागणार नाही यासाठी 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागेल. सर्व file कॉपी होतील, Install ,update आणि फाइनलाइजेशन होऊन 2 ते 3 वेळा संगणक रीस्टार्ट होईल. फाइनललाइज़ेशन झाल्यावर पढिल विंडो ओपन होईल. 
जसे...


या विंडोमध्ये user name तयार करा. तुम्हाला जे आवडेल ते नाव द्या जसे abc, somnath, office, Home असे काहीही लिहा फक्त वरच्या बॉक्समध्ये आणि next वर क्लीक करा..password विंडो येईल.
जसे..

हा विंडो ऐच्छिक असेल password नको असेल तर फक्त नेक्स्ट वर क्लीक करा.आता सगळ्यात महत्त्वाचे विंडो ओपन होईल product key विचरणा करणारे विंडो. 
जसे...

तुमच्याजवळ विंडो key असेल तर की टाकून नेक्स्ट करा अन्यथा खाली असलेल्या चेक बॉक्सवर क्लीक करून नेक्स्ट करा पुढे कधी की उपलब्ध झाल्यावर key टाकून activate करा. आता सेटिंगचा विंडो येईल त्यामधील पहिल्या पर्याय क्लीक करा आपोआप सेटिंग होईल. यानंतर Time आणि Date चा विंडो येईल.
जसे..

या विंडोमध्ये date, Time आणि timezone निवडा. timezone मध्ये +5:30 Chennai, Dhelhi दिसेल यावर क्लीक करून select करा आणि next करा..
आता नव्या नवलाइने आपल्या समोर नवीन विंडो ओपन होईल.
जसे...



सदर माहिती कसं वाटलं feedback मध्ये लिहायला विसरु नका. सदर पोस्ट तुम्हाला उपयोगी पडलं की नाही अथवा यातील नेमकं काय समजलं नाही आवश्य लिहा. तुमच्या कॉमेंटमुळे नवीन पोस्ट लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल.
धन्यवाद!

कृपया:- ©सदर ब्लॉगवरील माहिती जसेच्या तसे कॉपी करून आपल्या स्वत्:च्या ब्लॉगवर स्वत्:च्या नावे पोस्ट करु नका. कारण एक पोस्ट तयार करण्यासाठी किती कष्ट सहन करावं लागतं आपण जाणताच अशा प्रकारचे पोस्ट हल्ली दिसत आहेत म्हणून विनंती..

SHARE THIS POST   

  • Facebook
  • Twitter
  • Myspace
  • Google Buzz
  • Reddit
  • Stumnleupon
  • Delicious
  • Digg
  • Technorati
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्‍हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्‍यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्‍या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्‍हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्‍या माध्‍यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्‍ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →

31 comments:

  1. खूप च मस्त व उपयुक्त माहिती सोप्या पद्धतीने दिलीत सर,
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. गायकवाड सर खूप छान माहिती दिली आहे अभिनन्दन
    आपल्या सारख्या मित्रांमुळे आम्हाला तंत्रज्ञान शिकावे अशी प्रेरणा मिळते

    ReplyDelete
  3. गायकवाड सर खूप छान माहिती दिली आहे अभिनन्दन
    आपल्या सारख्या मित्रांमुळे आम्हाला तंत्रज्ञान शिकावे अशी प्रेरणा मिळते

    ReplyDelete
  4. गायकवाड सर,खूपच अमूल्य व तितकंच सुरेख असं मार्गदर्शन केलंत.आम्ही सगळेच आपले खूप आभारी आहोत.मी स्वतः खूप दिवस हि माहिती मिळवण्यासाठी धडपडत होतो. पुन्हा एकदा आभार.

    ReplyDelete
  5. गायकवाड सर खूप सुंदर माहिती आहे

    ReplyDelete
  6. गायकवाड सर खूपच छान pc फॉरमॅट करणे आता सोपे करून दिले आहे
    त्याबद्दल आपले धन्यवाद
    सरजी बूटेबल cd किंवा पेन ड्राईव्ह कसा तयार करावा याविषयी माहिती द्याल एकदा पुनःश्च धन्यवाद

    ReplyDelete
  7. गायकवाड सर खूपच छान pc फॉरमॅट करणे आता सोपे करून दिले आहे
    त्याबद्दल आपले धन्यवाद
    सरजी बूटेबल cd किंवा पेन ड्राईव्ह कसा तयार करावा याविषयी माहिती द्याल एकदा पुनःश्च धन्यवाद

    ReplyDelete
  8. Very good information dear gaikwad sir thanks to you

    ReplyDelete
  9. Very good information dear gaikwad sir thanks to you

    ReplyDelete
  10. Very nice information sir, thanks.

    ReplyDelete
  11. Very nice information sir, thanks.

    ReplyDelete
  12. खूपच छान माहिती आहे
    धन्यवाद

    ReplyDelete
  13. खूपच छान माहिती आहे
    धन्यवाद

    ReplyDelete
  14. छान माहिती आहे
    Nice Sirji
    Sirji apan ya page war je fecebook twiter ji Gadi takli Tyavishayi mahiti milali tr changale hoil.

    ReplyDelete
  15. खूप महत्वाची माहिती दिलीत सर आपण.

    ReplyDelete
  16. खूप महत्वाची माहिती दिलीत सर आपण.

    ReplyDelete
  17. सर बूटेबल cd अथवा pendrive डाटा कसा मिळेल

    ReplyDelete
  18. महत्वाची माहीती सर धन्यवाद
    महत्वाची माहीती सर धन्यवाद

    ReplyDelete
  19. फारच छान माहिती आहे.

    ReplyDelete
  20. फारच छान माहिती आहे.

    ReplyDelete
  21. खूप उपयुक्त माहिती दिलीत सर,मनःपूर्वक धन्यवाद !!!!

    ReplyDelete
  22. सर माझ्या pc मध्ये पाच drives आहेत. त्यातील C-Drive वर Windows7 आहे व D- drive वर XP आहे. इतर drive वरील data delete न होता PC format करण्यासाठी व काय करावे. कृपया मार्गदर्शन करावे. Windows7 योग्य की windows10 योग्य.
    PC details:-HD 500GB, Ram 3GB. Thank you.

    ReplyDelete
  23. खूप खूप धन्यवाद सर।

    ReplyDelete