Wednesday, 9 March 2016
ई-लर्निंग साहित्य तयार करण्यासाठी अथवा video editing करण्यासाठी Top 5 Free Softwares
शिक्षण क्षेत्रात आज आपण पाहतो की सर्वत्र Techno savvy, ई-लर्निंग आणि डिजिटलाजेशन होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अनेक डिजिटल साधनांचा वापर प्रभावीपणे होत आहे यामध्ये रोज असंख्य डिजिटल अध्यापन साधने तयार होत आहेत. या मध्ये कांही फक्त दृक स्वरूपाचे असतील तर कांही श्राव्य स्वरूपाचे असतील पण या साधनांचा वापर अनेक शाळेत होत आहे हे मात्र 100% सत्य. विद्यार्थी असो अथवा सामान्य माणूस असो पाहणे आणि ऐकणे एकाचवेळी घडल्यास जास्त स्मरणात राहते त्यालाच आपण दृकश्राव्य साधन असे म्हणतो. या प्रकारचे दृकश्राव्य साधने शाळेत इलर्निंग अथवा techno savvy झाल्यापासून प्रत्येक शिक्षक अत्यंत प्रभावीपणे तयार करत आहेत आणि वापरत आहेत. दृकश्राव्य साधन साधन म्हणून आपण video ला ओळखतो. video पेक्षा प्रभावी दुसरा दृकश्राव्य साधन असेल असं मला वाटत नाही. जिल्हा परिषद शाळेत तयार झालेले असंख्य videos आज Youtube सारख्या social मिडियावर दिसतात. तेंव्हा वाटतं की जिल्हा परिषद शाळा सुध्दा इंग्रजी माध्यमाच्या शाळेला सहज टक्कर देऊ शकतील असा आत्मविश्वास प्रत्येक शिक्षकांमध्ये निर्माण होत आहे. याला खतपाणी घालण्याचे काम वरचे अधिकारी, प्रशासन आणि कांही प्रमाणात का होईना नेते मंडळी करत आहेत. असे जर चित्र अजून दोन तीन वर्षे राहिल्यास संपुर्ण भारत डिजिटल होण्यास वेळ लागणार नाही.
दृकश्राव्य साधने म्हणजेच video तयार करण्यासाठी अनेक सॉफ्टवेयर प्रत्येकजण आपापल्या सोईनुसार वापरत आहेत या मध्ये बहुतेक सॉफ्टवेयर चांगले आहेत मात्र ट्रायल स्वरूपाचे आहेत अशा वेळी कांही दिवसानंतर सॉफ्टवेयर बंध पडतात तेंव्हा मात्र पंचायत होते. असंख्य सॉफ्टवेयर free स्वरुपात मिळतात मात्र माहिती नसल्यामुळे आपण वापर करत नाही तर अशाच प्रकारचे free सॉफ्टवेयर बाबत मी आज सांगणार आहे त्याच्या फायदे तोटेसह...
संपुर्ण पोस्ट वाचण्यासाठी Read more वर क्लीक करा..
1.Easy video maker
दृकश्राव्य साधन ( video ) तयार करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा सॉफ्टवेयर आहे. याला all in one editing software म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कारण या मध्ये सर्व काही एडिटिंग करता येणे सहज शक्य आहे. वापरण्यास पण सहज सुलभ असा हा सॉफ्टवेयर पूर्णपणे मोफत मिळते(user friendly)
* Main features
1.Make high quality video
2.powerful audio editor
3.Lyrics video maker
4.Record capture screen
5.take snapshots
6.mix audio
7.add mask effect, transitions effect, motion effect and more effects...
1.Make high quality video
2.powerful audio editor
3.Lyrics video maker
4.Record capture screen
5.take snapshots
6.mix audio
7.add mask effect, transitions effect, motion effect and more effects...
या सॉफ्टवेयरचा साइजही इतर सॉफ्टवेयरच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. 50 ते 60 mb size.
2. PowerDVDpoint lite
ज्याना power point वरील स्लाइड्स वीडियो मध्ये कन्वर्ट करावयाचे आहेत त्यांच्यासाठी हा सॉफ्टवेयर कामाचा आहे. यामध्ये या व्यतिरिक्त इतरही videos editing करता येते.
*office 2013, 2007, 2003 असे अनेक ऑफिस सॉफ्टवेयरला सपोर्ट करते.
* *.ppt, *.pps, *.pptx, *.ppsx अशा सर्व प्रकारच्या फाइल सपोर्ट होतात.
* wmv , ASF, m4v या फॉर्मेटमध्ये videos तयार होतात.
*free software मध्ये फक्त एकाच ppt फाइलचे video मध्ये रूपांतर करता येते मात्र pro version मध्ये एकाच वेळी 15 ppt फाइल एका वीडियोमध्ये रूपांतर करता येते.
3. Window movie maker
सर्वाना परिचित असलेला video एडिटिंग सॉफ्टवेयर पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. माइक्रोसॉफ्ट या कंपनीच्या साईटवरुन सहज डाउनलोड करून घेता येते. या सॉफ्टवेयरमध्ये अनेक सुविधा आहेत की या द्वारे संपुर्ण video edit करता येते.
*प्रत्येक जण window os वापरत असल्यामुळे हा सॉफ्टवेयर सहजपणे इनस्टॉल करता येते काही अडचण येत नाही. यामध्ये पण ppt चा रूपांतर video मध्ये करता येते मात्र पध्दत थोडं वेगळी आहे. सर्व स्लाइड image मध्ये कन्वर्ट करून करता येते.
यामध्ये प्रामुख्याने ..
*drop and drag चा वापर करून सहज वीडियो edit करता येते
*adding title
*Audio track editing
4. Virtual Dub
Video editing साठी प्रभावी आणि सुलभ सॉफ्टवेयर म्हणून virtual dub चा नाव घेता येईल. या मध्ये अनेक चांगले सुविधा एडिटिंग करण्यासाठी उपलब्ध आहे. जसे की..
*video compression
*video splitting
*video joining
*animation
*video splitting
*video joining
*animation
5. Blender
तुम्हाला जर 3D video तयार करायचं असेल तर Blender सॉफ्टवेयर वापरून तयार करता येईल. हा सॉफ्टवेयर पूर्णपणे मोफत स्वरूपाचे सॉफ्टवेयर आहे. या मध्ये अनेक नवीन टूल्सचा वापर करता येते.
जसे की....
*3D content creation
*modeling tools
*advanced character animation tools
*advanced character animation tools
Blender चा webpage लिंक
वर सांगितल्या प्रमाणे अजूनही अनेक free video editing सॉफ्टवेयर आहेत पण त्यातल्या त्यात चांगले आणि सुलभ सॉफ्टवेयरचा सामावेश केलेला आहे.
वर सांगितल्या प्रमाणे अजूनही अनेक free video editing सॉफ्टवेयर आहेत पण त्यातल्या त्यात चांगले आणि सुलभ सॉफ्टवेयरचा सामावेश केलेला आहे.
महत्त्वाचे :- सर्व सॉफ्टवेयरचा home page चा लिंक देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या - त्या सॉफ्टवेयरचा डाउनलोड त्यांच्याच page वरुन करून घ्या..
*कोणत्याही सॉफ्टवेयरचा Advertising, अथवा होस्टिंग करण्यासाठी सदर माहिती दिलेला नाही. जे मला योग्य वाटलं ते या द्वारे मांडण्याचा एक प्रयत्न ..
कांही professional video editing software बाबत...
आपण अनेक Bollywood, Hollywood प्रकारचे सिनेमा रोज tv, अथवा अन्य माध्यमाद्वारे पहात असतो. एक movie तयार करताना जवळ जवळ 30 ते 40 टक्के एडिटिंग फक्त सॉफ्टवेयरद्वारे करावे लागते. Hollywood मध्ये तर याचा प्रमाणे जास्त असते 60 ते 70 टक्के काम सॉफ्टवेयर मधून करतात. तर मग कोणत्या सॉफ्टवेयर मधून करत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का ? ....
movie तयार करण्यासाठी या सॉफ्टवेयरचा प्रामुख्याने वापर केला जातो.
Advanced color correction साठी हा सॉफ्टवेयर ओळखला जातो. कोणत्याही वातावरणात सूट केलेला video या मध्ये edit करता येते.
या सॉफ्टवेयरचा सर्वसामान्यपणे किंमत $ 29995 इतका आहे.
*या सॉफ्टवेयरचा lite version मोफत वापरण्यास मिळते कोणाला professional एडिटिंग शिकायचे आहे त्याना शिकन्यास सुवर्णसंधी आहे. मात्र यामध्ये सर्व सुविधा मिळत नाही.
Advanced color correction साठी हा सॉफ्टवेयर ओळखला जातो. कोणत्याही वातावरणात सूट केलेला video या मध्ये edit करता येते.
या सॉफ्टवेयरचा सर्वसामान्यपणे किंमत $ 29995 इतका आहे.
*या सॉफ्टवेयरचा lite version मोफत वापरण्यास मिळते कोणाला professional एडिटिंग शिकायचे आहे त्याना शिकन्यास सुवर्णसंधी आहे. मात्र यामध्ये सर्व सुविधा मिळत नाही.
Hitfilms Express
Lightworksfree
Natron's
वरील सॉफ्टवेयर Hollywood film तयार करण्यासाठी भरपूर एनीमेशनचा वापर करण्यासाठी वरील सॉफ्टवेयरचा वापर केला जातो. Multitasking स्वरूपाचे सॉफ्टवेयर आहे म्हणजे एकाच वेळी अनेकजण एकाच सॉफ्टवेयर हाताळतात. एडिटिंग करतात. याचा किंमत $ 29999 इतके आहे.
हा सॉफ्टवेयर free light version उपलब्ध आहे. एकदा आवश्य वापरून पहा...
Lightworksfree
Natron's
वरील सॉफ्टवेयर Hollywood film तयार करण्यासाठी भरपूर एनीमेशनचा वापर करण्यासाठी वरील सॉफ्टवेयरचा वापर केला जातो. Multitasking स्वरूपाचे सॉफ्टवेयर आहे म्हणजे एकाच वेळी अनेकजण एकाच सॉफ्टवेयर हाताळतात. एडिटिंग करतात. याचा किंमत $ 29999 इतके आहे.
हा सॉफ्टवेयर free light version उपलब्ध आहे. एकदा आवश्य वापरून पहा...
अत्यंत महत्त्वाचे :-
©** वरील माहिती व्यावसायिक (आर्थिक लाभासाठी) कारणासाठी करु नये. ज्याना आवश्यक आहे त्यांना सांगा अथवा share करा. इतर मीडियावर शेयर करताना कृपया स्वत:च्या नावानी प्रशिध्द करु नये.
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
सोमनाथ सर अतिशय मस्त असा ब्लोग तयार केले आहेत आणि वेळोवेळी मोबिले च्या माध्यमातून आपण मला मदत सुधा केलेली आहे मी नेहमी आपला ऋणी राहीन सर ब्लोग वर मेनू आणि सुब्मेनु बद्दल माहिती पोस्ट करावी हि नम्र विंनती
ReplyDelete👌👌👌👌👌👌👍👍👍👍
ReplyDelete👌👌👌👌👌👌👍👍👍👍
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteLउपयुक्
ReplyDeleteNice And Alwayes Usefull information Sirji
ReplyDeleteसर अतिशय उपयुक्त माहिती आहे शैक्षणिक साहीत्य बनवण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteUsefull info.sirji, Thanks!!!
ReplyDeleteखूपच छान माहिती आहे सर
ReplyDeleteNice information sir.
ReplyDeletewww.ictforstud.blogspot.in
खूप छान व उपयोगी माहिती सर
ReplyDelete